

esakal
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे विसाव्या शतकातील भारतातील एक महान प्रकांड पंडित होते. मानवशास्त्राच्या विविध शाखांचे त्यांना सखोल ज्ञान होते आणि जवळजवळ शतकभर ते सामाजिक क्षेत्रातही तितक्याच सक्रियतेने कार्यरत होते.
विलक्षण बाब म्हणजे, कोलकाता येथील गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेजकडून १९२१ साली मिळवलेली ‘तर्कतीर्थ’ ही लक्ष्मणशास्त्री जोशी यांची एकमेव पदवी होती. भारतीय व पाश्चात्य तत्त्वज्ञानावर अधिकारवाणीने बोलणारे आणि लिहिणारे शास्त्रीजी यांचे औपचारिक शिक्षण फारसे नव्हतेच. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवन आगळेवेगळे होते.