Teacher Development: शिक्षक, काळ आणि सॉफ्ट स्किल्स बदललेलं अध्यापन आणि नवी जबाबदारी
Educational Growth: शिक्षकांची भूमिका २१ व्या शतकात झपाट्याने बदलली आहे. माहिती देणाऱ्यापासून माणूस घडवणाऱ्यापर्यंत हा बदल झाला असून, सॉफ्ट स्किल्स आता शिक्षणाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर आहे, असं आपण नेहमी म्हणतो. पण ही शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, पायऱ्या नाही, घंटा नाही, बोर्डही नाही… ती जिवंत होते तेव्हा जेव्हा तिच्यात एक ‘माणूस’ असतो – तो म्हणजे शिक्षक.