

United Nations Turns 80
sakal
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनायटेड नेशन्स) स्थापनेला 24 ऑक्टोबर 2025 रोजी 80 वर्षे पूर्ण झाली. 194 सदस्य राष्ट्रांच्या या जागतिक संघटनेने गेल्या 80 वर्षात काय साध्य केले? साउथ सुदान हे 193 वे सदस्य राष्ट्र असून, 194 अंक हा पॅलेस्टाईनच्या संदर्भात वापरला जातो. पॅलेस्टाईनला निरिक्षक राष्ट्राचा दर्जा आहे. पूर्ण सदस्य राष्ट्राचा दर्जा मिळावा, म्हणून गेली अर्धशतक हे अघोषित राष्ट्र प्रयत्नशील आहे.