

Film Review | We Are All Strangers (2026) | Singapore Cinema
esakal
जयदीप पाठकजी
५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप शनिवारी सिंगापूरच्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटाने झाला. तरल नातेसंबंधांवर आधारित या चित्रपटाचा रसास्वाद....
काही चित्रपटांमध्ये फार मोठ्या घटना घडत नाहीत; पण पडद्यावर उमटणारे छोटे छोटे क्षण मनाच्या पडद्यावर मात्र दीर्घकाळ रेंगाळत राहतात. एखाद्या माणसाने दुसऱ्यासाठी नकळत केलेली काळजी, नात्यांमधली अवघडलेली जवळीक, न बोलताही व्यक्त होणाऱ्या भावना आणि अचानक आलेली अनपेक्षित कलाटणी... या सगळ्यांतून जगण्याचा अर्थ शोधणारा अँथनी चेन यांचा ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ हा चित्रपट असाच मनात घर करणारा अनुभव आहे.