"जेव्हा मना लाभे आनंद, तोच जीवनाचा परमानंद होय...!'

 "When the mind finds happiness, that is the bliss of life ...!"
"When the mind finds happiness, that is the bliss of life ...!"

सारे कसे सुरळीत चालले होते. मुलाच्या 10वीचं टेंशन मिटत चाललं होतं. सर्व सुटीचे नियोजन आखून झाले होते... आणि अचानक कोरोनाचा बॉम्ब फुटला अन्‌ सारे तितर-बितरच झाले. कर्फ्यू, लॉकडाउनने या साऱ्यांचा जीव घेतला. जीवन एका नव्या काटेरी मार्गी येऊन थांबले. आनंदावर विरजण पडले. कोरोनाने हाहाकार माजवला. चीनकडे लक्ष लागून हळूहळू तो जगात दिवसागणिक पसरू लागला... रोज बातम्या, बातम्या, बातम्या..!! 


झालं, हा हा म्हणता म्हणता लॉकडाउन घोषित झाला, प्रचार, प्रसार माध्यमे जीव घेऊ लागल्या... डोळ्यांसमोर काळोखच काळोख पसरला. मनात प्रश्‍नच प्रश्‍न.. काय होणार या कोरोनामुळे.. चीनमध्ये मृतांचा खचच्या खच पाहून जीव घाबरून गेला. दुकाने बंद, मॉल बंद, थिएटर्स बंद, लोकांची एकच धावपळ किराणा, धान्य जमविण्यासाठी. रस्त्यावर पोलिस लाठीमार... दिसला की धोपट, एकमेकांशी संपर्क, प्रत्यक्ष न भेटणे... आठ दिवस मजा वाटली, ना कोठे जाणे, ना कोणी येणे नाही. मस्त मजेत गेले आठ दिवस!!! सगळी मंडळी घरात, छानच वाटायचे. कारण आता हे चित्र कोठे पाहायला मिळते?... गेले ते दिन गेले!! विरह नशिबी आले!! 

सगळ्यात गंमत म्हणजे कामवाली बाई सुटीवर!! घ्या पस्तावा!! सगळी कामे म्हणजे घर आवरणे, भांडी घासणे, कपाट आवरणे, पुस्तके, पेपर्स सर्व आवरून झाले. टीव्ही बघून कंटाळा यायला लागला. आता मात्र जीव ऊबून गेला... मन उदास झाले. मन रडू लागले. मन काहीतरी मागणी करू लागले.... अस्थिर मना कसं सावरू तुला?? अन्‌ अचानक माझ्या डोक्‍यात वीज चमकली जणू ती मला ऊर्जाच देऊन गेली... मनःशांती, yes our body needs om shanti.  मग मी या कोरोनामय जीवनातून बाहेर येण्यासाठी धडपड करू लागले. गुगल सर्च केले, पुस्तके वाचली.... मैत्रिणींशी संवाद साधला... मला मार्ग सापडला. घरच्यांना life style समजावून सांगितली.

एक नवं चैतन्यरूपी बहार आमच्या घरी आली... सकाळी लवकर उठणे.. अन्हिके आवरून आम्ही सारे योग, मेडिटेशन, प्राणायाम, हलकासा व्यायाम, झुंबा डान्स इत्यादी वयापरत्वे करू लागलो... पण डिस्टंट ठेवूनच बरं का... गरम पाणी, लवंग, दूध- हळद, आलं, लिंबू अल्टरनेट सुरू झाले. कारण कोरोनाशीींलढायचंय तर इम्युनिटी पॉवर वाढवायची !! होय ना!!!  त्यानंतर पौष्टिक नाश्‍ता, जेवण, दुपारचा नाश्‍ता, रात्रीचे जेवण हे मी व मम्मीने वेळापत्रकच आखले व त्यानुसार आमची दिनचर्या सुरू झाली. आपल्या मनःशांतीसाठी मी एक तास बागेत घालवून झाडांची निगा राखू लागली, कुंड्या रंगविणे, तण उपटणे, वाळलेली पाने काढणे... त्यानंतर रेसिपीज. वेगवेगळं करण्याचा छंदही जोपासला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्षत्र काव्य साहित्य मंच जॉइन झाले. रोज उपक्रमांची मांदियाळी व प्रमाणपत्राची रेलचेल चालू झाली. देवपूजा करून मांगल्यमय वातावरणात भर पडली... सकाळ - सायंकाळ शंखनाद, घंटानाद, कापूर, लवंग जाळून शुद्धता आणणे... त्यानंतर फॅमिलीबरोबर गप्पाटप्पा, चेष्टामस्करी, मस्ती, गाण्याच्या भेंड्या, नवनवीन खेळ, अंताक्षरी, इतकेच नाही तर आम्ही जसा येईल तसा डान्स पण शिकत आहोत. कारण माझी नात एक्‍स्पर्ट इन डान्सिग. आणखी एक गमतीची गोष्ट, कधी कधी आम्ही चक्क मेकअप करून सेल्फी पण काढायची हौस पूर्ण केली. 


मनाशी पूर्ण ठरवूनच टाकले की कोरोनाने आपल्याला चांगलाच धडा शिकविला की तुम्हीच तुमचे रक्षक व्हा, स्वच्छता पाळा, हात वारंवार धुवा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स ठेवा, बाहेर कारण नसताना फिरू नका, सकस अन्न खा, संत्र्याचा जास्तीत जास्त वापर करा, आता ही स्टाइल जर आपण अंगीकृत केली तर कोरोनाला लवकरच पळवू.... पूर्वी योगसाधना करून ऋषीमुनी विद्या प्राप्त करायचे. आपण रामायणात बघितलेच, किती सात्त्विक शक्ती होती. त्याचं कारण सात्त्विक आहार, योग, प्राणायाम हेच खरे. याच योग, मेडिटेशनमुळे मी सकारात्मकता शिकले, नाहीतर थोडं दुखले तरी मी घाबरून दवाखान्याकडे धाव घ्यायची. आता दोन महिने झाले मी एकही गोळी खाल्ली नाही. मी मनाप्रमाणे काम करते. कंटाळा आला तर सरळ बसून घेते. कामात बदल करते. संगीताने मन आनंदी होते. मला जुनी गाणी ऐकण्याचा, गुणगुणण्याचा छंद आहे. तो मी जोपासते. मन:स्वास्थ्यासाठी, दैवी शक्ती वाढविण्यासाठी श्री गजानन महाराज, हनुमान चालिसा, देवी माहात्म्य वाचन करते. या साऱ्यांचा मला माझ्या जीवनात खूप सकारात्मकता आणण्यासाठी उपयोग होतो. शेवटी काय आहे माहितेय का.... 
"जेव्हा मना लाभे आनंद 
तोच जीवनाचा परमानंद होय...!' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com