

Maharashtra Municipal Election News
ESakal
महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात ही लढत मतदानाच्या आधीच संपल्याचा सूर राज्यभर उमटू लागला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच राजकारणाने असा वेग घेतला की निवडणूक प्रक्रियेचा आत्माच धोक्यात आला आहे.