Lok Sabha Elections 2024: संदेशखाली प्रकरणामुळे लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे राजकीय समीकरणं बदलणार का?

West Bengal Lok Sabha Elections 2024: सध्या पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली प्रकरणाच्या मुद्यावरुन चांगलच राजकारण तापल आहे. त्यातील मुख्य आरोपी शाहजहां शेखला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शाहजहांवर संदेशखालीमधील नागरिकांवर अन्याय तसेच तेथील काही महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात आले होते.
West Bengal Sandeshkhali Case change the political equations of TMC in Lok Sabha elections 2024
West Bengal Sandeshkhali Case change the political equations of TMC in Lok Sabha elections 2024Sakal

- मनोज साळवे

West Bengal Lok Sabha Elections 2024: सध्या पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली प्रकरणाच्या मुद्यावरुन चांगलच राजकारण तापल आहे. त्यातील मुख्य आरोपी शाहजहां शेखला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शाहजहांवर संदेशखालीमधील नागरिकांवर अन्याय तसेच तेथील काही महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात आले होते.

या प्रकरणावरुन भाजपने ममता बॅनर्जी सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. पण हे प्रकरण काय आहे? संदेशखाली प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांवर परिणाम होणार का? जाणून घेऊया या लेखातून

संदेशखाली प्रकरण नेमकं आहे काय?

संदेशखाली हे पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर २४ परगणा जिह्यातील एक गाव आहे. या गावातील काही नेते त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथील महिलांवर अनेक दिवसांपासून अत्याचार करत होते. महत्वाचे म्हणजे तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहां यांच्यावरदेखील संदेशखालीतील महिलांवर अत्याचार तसेच छळ केल्याचे आरोप आहेत.

West Bengal Sandeshkhali Case change the political equations of TMC in Lok Sabha elections 2024
Modi Ka Pariwar: राहुल गांधींमुळं सुरु झालं होतं 'चौकीदार' कॅम्पेन, आता लालूंमुळं 'मोदी का परिवार'; जाणून घ्या भाजपची रणनीती

तेथील काही लोकांच्या जमिनी देखील त्यांनी बळकाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या रेशन कार्ड धान्यांमध्ये गैरव्यवहार केले असल्याचे देखील तेथील नागरिकांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांना अनेक सुविधांपासून देखील वंचित ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संदेशखालीतील नागरिकांनी आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.

पश्चिम बंगालची सध्याची राजकीय स्थिती काय?

सध्या पश्चिम बंगामधील राजकारणाचा विचार केला तर तेथे भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस पक्ष या दोन पक्षांचे वर्चस्व आहे. त्यानंतर काँग्रेस, सीपीएमसह अन्य पक्ष आहेत. तेथे तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्त्ता असून, सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी कार्यरत आहेत. त्यामुळं संदेशखाली प्रकरण चांगलेच गाजताना दिसत आहे.

West Bengal Sandeshkhali Case change the political equations of TMC in Lok Sabha elections 2024
Delhi Govt : दिल्लीत 18 वर्षांवरील सर्व महिलांना महिन्याला मिळणार हजार रुपये! जाणून घ्या काय आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

सध्याची स्थिती पाहिली तर या प्रकरणाचं राजकीय श्रेय घेण्यासाठी इतर पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. येत्या काही महिन्यांतच लोकसभेच्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आता या प्रकरणाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकांत संदेशखाली प्रकरण ममतांची डोकेदुखी वाढवणार का?

येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला म्हणजेच ममता बॅनर्जींना संदेशखालीमध्ये झालेल्या घटनेचा तोटा होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. त्यामुळे संदेशखाली प्रकरण येत्या निवडणुकांसाठी ममतांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याच मत तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहे.

संदेशखाली मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

संदेशखाली मतदार संघातील गेल्या काही वर्षाचा आलेख पाहिला तर बीजेपीने अनेक जागांवर आपले गड राखल्याचे दिसत आहे.

संदेशखाली मतदारसंघाचा इतिहास
संदेशखाली मतदारसंघाचा इतिहासSakal

ममता बॅनर्जी इतरवेळी विरोधी पक्षांवर टिका करताना दिसतात. पण या प्रकरणात थेट लोकांकडून आरोप होत असल्याने ममतांवर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका होताना दिसत आहे. तसेच राज्याची कायदाव्यवस्था आणि महिलांच्या संरक्षणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com