

दिपाली सुसर
आज ‘जागतिक अन्न दिवस’. अन्न हे आपल्या पोटाची भूक शांत करतं. जर वेळेवर पुरेसं अन्न पोटात नाही गेलंस, तर माणसाची चिडचिड होते. माणसाच्या पोटात तोडू लागतं. त्याचा परिणाम मनावर आणि आपल्या कामावरसुध्दा होतो. थोडक्यात काय तर माणसाला जिवंत राहण्यासाठी लागणारी मुलभूत गरज अन्न आहे. आता दोन-तीन दिवसाआधीच अन्नावरुन एक किस्सा घडला, मला तुम्हाला तोच सांगायचा आहे.
मी सध्या दिल्लीत राहते. संध्याकाळी मी सोसायटीत बाहेर फिरायला पडले होते. बाहेर छोट-छोटे मुलांना घेऊन त्यांच्या मम्मी आलेल्या असतात. गप्पा गोष्टी होतात. प्रसन्न वाटतं. त्यादिवशी मी बाहेर गेली आणि सहजच कामवाल्या ताईचा विषय निघाला, तर मला एकीनं विचारलं, चांगला स्वयंपाक करतील अशा कुणी कामावाल्या ताई आहेत का गं? तर मी त्यांना सांगितलं की, हो आहे. आमच्या मित्राकडे येतात त्या. ज्या ताई आमच्या मित्राकडे येतात, त्या उत्तम जेवण बनवतात. मग त्या महिलेनं म्हटलं, चालेल त्यांना आमच्याकडे पाठवून दे. तसा निरोप मी मित्राला दिला आणि त्यानं त्या कामावाल्या ताईला त्यांच्याकडे पाठवलं. काल संध्याकाळी त्यांना विचारलं की, येत आहेत का त्या ताई तुमच्याकडे स्वयंपाक करायला? तर त्या बोलल्या तिला नाही म्हणून सांगितलं. कारण विचारलं तर त्या म्हणाल्या, ती कामवाली बाई ख्रिश्चन आहे. त्यामुळे मी नाही लावलं त्यांना कामाला. कारण मला देवाला रोज सकाळी भोग दाखवावा लागतो. एक ताई आहेत ज्या आमच्याच समाजातील आहेत, मी त्यांना बोलावणार आहे आता. हे ऐकून मला धक्काच बसला.
गावाकडे एक म्हण आहे पोटाच्या भुकेला जात नसते. पण इकडे जात बघून ठरवलं जातं की तुम्ही आमचं जेवण तयार करु शकता की नाही. हे वास्तव आहे आजचं. असो. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की, आपल्याला भेटतं त्या अन्नाचा, ते अन्न तयार करणाऱ्याचा आदर करावा. कारण आजही आपल्या देशात असे कोट्यवधी लोक आहेत जे अन्नासाठी जेवणासाठी तरसतात. म्हणून जितकं लागतं तितकं ताटात घ्या अन् शिल्लक असेल तर त्याची नासाडी न करता ते गरजू लोकांना दया. मी जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये जाते तेव्हा घेतलेली भाजी-भात, जे उरेल ते पॅक करुन आणते अन् रस्त्यानं असं कुणीतरी भेटतच. ज्याला याची गरज आहे, त्याला ते देऊन टाकते. दुसरं घरात जर का कधी भाजीपोळी शिल्लक उरली, तर ती लगेच गरम-गरम असतानाच कचरा उचलणाऱ्या दादाला देऊन टाकते. दुसऱ्याला अन्न देताना डोक्यात जात-पात न ठेवता, फक्त एकच काळजी घ्यावी, ते अन्न चांगलं असावं, माणसाला खाता येईल या दर्जाचं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.