मी पुन्हा येणार, म्हणणारेच अस्वस्थ; शरद पवारांचा निशाणा

sharad pawar
sharad pawaresakal
Updated on

मुंबई : उध्दव ठाकरेंना (uddhav thackeray) मुख्यमंत्री बनायचं होतं. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी फडणवीसांना उत्तर देत निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री बनण्यासाठी उध्दव ठाकरेंचा हात मी वर केला...

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनायला तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजावाला संधी द्यावी यासाठी मी त्यांचा हात वर केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.

sharad pawar
कोळशाचे १४०० कोटी थकवले सांगता, GST च्या ३५ हजार कोटींचं काय? - शरद पवार

केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय

केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. सामान्यांचे प्रश्न वाढत आहेत. पण केंद्राला याची आस्था नाही. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत हे असं कधी घडलं नव्हतं. केंद्र म्हणतं आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने हे होतंय. पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत. इतर देशात मात्र किंमती कमी होतायेत. केंद्राने या दरवाढीतून उत्पन्न वाढविण्याचे स्रोत निर्माण केले आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सलग दहा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तेव्हा भाजपने ओरड सुरू केली होती. पण आज मात्र ते गप्प आहेत.

sharad pawar
...आणि मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला!

आयकर विभागाने धाडीत, काहीच मिळालं नाही

अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी इनकम टॅक्स विभागाने छापे मारले. हे प्रकरण न्यायालयात जाणार असल्याने अधिकच बोलत नाही. पण यातून काही निष्पन्न होईल असं दिसत नाही. पण चौदा-पंधरा व्यक्तींच्या पथकाने छापा टाकला. आता मध्यम वर्गीयांच्या घरात पाच दिवस थांबले मग त्यांचा पाहुणचार कसा करायचा असा प्रश्न पडतोच. शेवटी यात अजित दादांचे नाव आहे का? त्यामुळं माझा आक्षेप हा आहे की चौकशी करा पण त्यानंतर काम संपताच निघून जावं ना, पाच दिवस पाहुणचार घेऊ नये. एखादा दिवस ठीक आहे. पण इतके दिवस थांबल्यावर पाहुण्यांना हाकलून द्यायला हवं. पण यात पाहुण्यांचा दोष नव्हता त्यांना हाताळणाऱ्यांची ही चूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com