esakal | विजेच्या धक्क्याने कर्मचाऱयाचा खांबावर मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्क्याने कर्मचाऱयाचा खांबावर मृत्यू

पुणे : पुण्यातील बिबवेवाडीच्या गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील शांतीनगर सोसायटीसमोर विद्युतखांबावर वाहिनीची दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून महावितरणच्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने कर्मचाऱयाचा खांबावर मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील बिबवेवाडीच्या गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील शांतीनगर सोसायटीसमोर विद्युतखांबावर वाहिनीची दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून महावितरणच्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाला. अमोल सांबारे असे त्यांचे नाव आहे. 
काही दिवसांपूर्वी येथे काम करताना एक कर्मचारी गंबीर जखमी झाला होता. येथील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱयाचा नाहक बळी गेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.