नेत्यांच्या बेकायदेशीर बॅनरबाजीवर कारवाई गरजेची

राजेश बगरेचा
Monday, 10 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

डेक्कन : आपण आपल्या नेत्यांना काय म्हणायचे? तेच कळत नाही. डेक्कन परिसरात दिशा दर्शक फलकावरच बॅनर लावले आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी काही नेत्यांनीच बॅनर लावले आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिका मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी कडक कायदा हवा. वाढदिवस शुभेच्छांसाठी बेकायदेशीर बॅनरबाजी करणाऱ्या संबधीत पक्षाला जबाबदार धरण्यात यावे. अशा बेकायदेशीर बॅनर बॅनरवर नावाचा उल्लेख असलेल्या सर्व नेत्यांवर दंड का लावण्यात येत नाही? याचे उत्तर महापालिकेने द्यावे. जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही. होर्डिंग आणि बॅनरमूळे अणखी निष्पाप जीव जाणार नाहीत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action needed on the illegal banners of the leaders