हडपसरमधील पत्रकबाजांवर दंडनीय कारवाई व्हावी

पुरुषोत्तम काळे
Monday, 14 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

हडपसर : येथे पुलांवर, भिंतीवर पत्रके चिटकवली आहे. जाहिरात कुठे लावावी अन् कुठे लावु नये हे पण कळत नाही या महाभागांना! शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रशासनाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी चौकांचे सुशोभिकरण, बसथांब्याची सजावट, पुलाखाली पुलाच्या खांबाना सुरेख रंगकाम हे सर्व महापालिकेच्या माध्यमातून होते

 सार्वजनिक हितासाठी केलेल्या कामांना काही उद्योगी नागरिकांचेच गालबोट लागते. या सुंदर परिसराचा वापर पत्रके व जाहिराती चिकटावुन सर्वत्र घाण केली जाते. हे प्रकार थांबविण्यासाठी पालिका प्रशासनाने जाहिरातीवर असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधुन स्थानिक लोकप्रतिनीधींच्या दबावाला बळी न पडता संबंधितांवर दंडनीय कारवाई करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action should be taken against the Penal In the Hadapsar