येवलेवाडीत तीन महिन्यानंतरही रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत

प्रशांत सानप
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सुमारे तीन महिन्यांपूर्वी येवलेवाडी येथे सासवड-कोंढवा रस्ता ते धांडेकर नगर रस्त्यावर भूमिगत विद्युत योजनेचा वायर टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मुख्य रस्त्यापासून हिताची ऑटोमोटिव्ह कंपनी पर्यंतचा रस्ता हा पेव्हिंग ब्लॉकचा होता. काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले तरी कंत्राटदार व लोकप्रतिनिधींचे रस्ता पूर्ववत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. काढलेल्या पेव्हिंग ब्लॉकचा रस्त्याचा बाजूस खच पडला आहे. रस्ता अरुंद- असमतोल झाल्याने व या रस्त्यावरून अनेक जड वाहनांचा वावर असल्याने नागरिकांना जाता येता कसरत करावी लागत आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन रस्ता पूर्ववत करावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After three months work of road is pending in Yevalewadi