वडगाव बुद्रुक रस्त्यावर पुन्हा भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

वडगाव बुद्रुक : वडगाव बुद्रुक येथे लाखो रुपये खर्च करून भाजी मंडई तयार करण्यात आली. सर्व भाजी विक्रेत्यांना योग्यरीतीने जागा वाटप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असेलेला वाहतुकीचा प्रश्न सुटला होता. परंतु अनेक भाजी विक्रेते भाजी मंडई सोडून समोरच्या रस्त्यावर बसले आहेत. तसेच एका चर्माकराने सुद्धा रस्त्यावर आपले दुकान थाटले आहे. अशा रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे पुन्हा वाहतुकीचा प्रश्न उद्भवत आहे. महापालिकेने याची दखल घेवून  यावर कडाक कारवाई करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: again encroachment of vegetable vendors on the road to Wadgaon Budruk road