#WeCareForPune बांधकामामुळे वृक्ष कोसळण्याच्या अवस्थेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 April 2019

शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये वाढ होत आहे. तापमानाच्या वाढीमुळे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पाणीटंचाईला सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

एक वेळ विकास झाला नाही तरी चालेल.! पण वृक्षतोड थांबली पाहिजे. वृक्ष जगवले पाहिजेत. यासाठी हा वृक्ष कोलमडून पडण्याच्या आत महापालिका उद्यान विभागाने या ठिकाणी चौथरा बांधून या वृक्षाचे रक्षण करावे. त्यामुळे अनेक पक्षांना त्यांचा निवारा, आपल्याला सावली व ऑक्सिजन यांचा फायदा आपल्याला पण होईल. यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा वृक्ष वाचवण्यासाठी तातडीने आदेश द्यावेत.
 
WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil agawane warn about tree can collapse due to construction