
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : पौड रस्त्यावरील गुजरात कॉलनी समोरील मेट्रोच्या खांबाचे फाऊंडेशन हे पूर्णपणे पाण्यात असल्याचे गेल्या महिन्यापासून दिसून येत आहे. फाऊंडेशन पाण्यामध्ये ठेवल्याचा प्रोसेस इतर खांबांच्या बाबत दिसला नाही. त्यामुळे हा बांधकामाचा प्रोसेस आहे की सुरक्षेबाबत निष्काळजी हे तपासण्याची गरज असून निकृष्ठ दर्जाचे काम भविष्यात घातक ठरु शकतात. मेट्रोचे खांब सुरक्षितपणे बांधले जात आहेत का? याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.