
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
भेकराईनगर : भेकराईनगर बसडेपोतील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सुरवातीलाच रस्ता बनविताना अर्धवट रस्ता बनविला आहे. अर्धा रस्ता डांबरी आहे तर अर्धा दगडी रस्ता आहे. सासवड मार्गे डेपो येणाऱ्या बस मार्गाची दुरवस्था झाली आहे. नेमकी रोजच्या बस जेथुन सुटतात आणि दिवसभर बस ये-जा करतात तोच रस्ता कच्चा आहे. त्यामुळे धोकादायक पध्दतीने बसची वाहतूक सुरु असते. तसेच या कच्चा रस्त्यामुळे बस पंक्चर होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तर चिखर आणि मातीमुळे रस्ता जास्त खराब होतो. तरी हा बसमार्ग दुरुस्थ करावा अशी प्रशासनास विंनती