पुणे : मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता, त्यात पौड रस्त्यावरील अनके व्यावसायिकांकडे स्वतःचे पार्किंग नसल्याने रस्त्यावरच गाड्या लावलेल्या असतात. काही दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर असलेल्या ओपन स्पेसची जागा पथारीवाल्यांना भाड्याने देऊन उत्पन्नवाढीचा मार्ग शोधला आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे.

पथारीवाल्यांचे पदपथावर झालेले अतिक्रमण आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांभोवती खवय्यांनी केलेली गर्दी, यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना कमी जागा शिल्लक राहिली आहे. त्यामुळे पौड रस्त्याला आलेल्या या बेशिस्तीला वाहतूक पोलिस, महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि कोथरूड पोलिस आवर घालणार आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. पौड रस्त्यावरील कोथरूड कचरा डेपो येथील बसथांब्याजवळ असलेल्या गॅरेजवाल्याने दुरुस्तीसाठी आलेली वाहने पदपथावर लावून नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ताच अडवला आहे. वाहन दुरुस्त करणाऱ्याकडे वर्कशॉपसाठी स्वतंत्र जागा नसल्याने उपलब्ध रस्त्याचा वापर करण्याकडे बहुतांशी लोकांचा कल असतो; परंतु हे करताना रस्त्याला वा पदपथाला अडथळा येणार नाही, याची खबरदारी संबंधित व्यावसायिकांनी घेतली तर वाहनचालकांना व नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही.