#WeCareForPune सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

अक्षय तेली 
Thursday, 28 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : नुकत्याच झालेल्या शिवजयंतीचे तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील युवाविश्व फाऊंडेशनच्या युवाकार्यकर्त्यांनी सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी गड परिसराची स्वच्छता करण्यात आली. युवाविश्व फाऊंडेशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमे अंतर्गत गडावरील पुणे दरवाजा, राजाराम महाराज समाधी, घोड्यांची पागा, कलावंतीण बुरूज परिसर, तानाजी कडा परिसर, कल्याण दरवाजा परिसर व गडावरील इतर ठिकाणांहून सुमारे वीस पोती कचरा गोळा करण्यात आला.

गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यात प्रामुख्याने प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण अधिक आढळून आले. तसेच दारूच्या बाटल्या, गुटख्याचे पुड्या यांचेही प्रमाण लक्षणीय होते. त्यामुळे गडावर नेण्यात येणाऱ्या बाटल्यांची नोंद ठेवून त्यावर दंडात्मक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे. पुण्यातील तरूणांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

तरूणांचा हा उत्साह पाहून गडावर आलेल्या अनेक पर्यटकांनी या कार्यास हातभार लावला. छत्रपती घराण्याचे (व्यंकोजीराजे भोसले यांचे) वंशज यांनीही गडावरती या युवकांची भेट घेऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness campaign on Sinhagarh fort