कस्तुरबा चौकातील शिल्पाचा चबुतरा सुशोभित करावा

नितिन राजे.
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून दयावे.

औंध : येथील विद्यापीठ रस्त्यावर कस्तुरबा वसाहतीजवळील चौकातील शिल्पाचा सिमेंटचा चबुतरा तोडण्यात आला. वाहतूकीस अडथळा होत असल्यामुळे हा चबूतरा तोडण्यात आला. मात्र यातील विटासदृश राडारोडा तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पास व चौकास बकालपणा आला आहे. या चौकातून वळण घेताना या राडारोड्याचा व लोंबकळणाऱ्या पाईपचा वाहनचालकास अडथळा होतो आहे. नुकतेच या मार्गाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. चबुतऱ्या नुतनीकरण कधी होईल ?
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Craft Pivot in Kasturba Chowk should be decorated