
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : औंध येथील अत्यंत वर्दळीच्या परिहार चौकात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नव्यानेच रस्ता बनविण्यात आला. मात्र या कामात चेंबरचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. परिहार चौकातच चेंबर खचला असून त्यावरील सिमेंट निघून गेले आहे. त्यावरील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनांची व नागरिकांची वर्दळ असणाऱ्या या चौकात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी महापालिका लक्ष देईल काय ?