धोकादायक विना आधाराचा ३५ फुटाचा विद्युत खांब 

मनोज शेट्टी
मंगळवार, 12 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : येरवड्यातील गुंजन चौकात सिग्नलला रात्रीच्या वेळेत लख्ख प्रकाश पडावा म्हणून साधारण ३५ उंचीच्या विद्युत खांबच्या साहाय्याने दिवे लावण्यात आले आहेत. सध्या त्या विद्युत खांबावर दिवे तर दिसत नाही.

विद्युत खांबाला आधार देण्यासाठी बांधलेला पाया तुटलेला आहे. विना आधाराचा हा विद्युत खांब सोसाट्याच्या वाऱ्याने कधीही खाली पडू शकतो. सदर विद्युत खांब काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. लोकप्रतिनिधी, वाहतूक विभाग आणि एमईसीव विभागाने याची गंभीर दखल घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dangers electric pillar of 35 feet without support

टॅग्स