
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, सतत घशाला कोरड पडत असल्याने थंड पाणी घशाखाली गेल्याशिवाय बरे वाटत नाही. मध्यमवर्गीयांच्या घरात उन्हाळ्यात फ्रिजची खरेदी वाढते. पण, अजूनही एक मोठा वर्ग आहे. त्यांच्याकडे अद्यापही फ्रिज खरेदी करण्यास पुरेशी आर्थिक तरतूद नाही. तसेच, काही लोक घरात फ्रिज असला, तरी माठातील पाण्याला पसंती देतात. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाला मागणी वाढत आहे.
पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, सतत घशाला कोरड पडत असल्याने थंड पाणी घशाखाली गेल्याशिवाय बरे वाटत नाही. मध्यमवर्गीयांच्या घरात उन्हाळ्यात फ्रिजची खरेदी वाढते. पण, अजूनही एक मोठा वर्ग आहे. त्यांच्याकडे अद्यापही फ्रिज खरेदी करण्यास पुरेशी आर्थिक तरतूद नाही. तसेच, काही लोक घरात फ्रिज असला, तरी माठातील पाण्याला पसंती देतात. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाला मागणी वाढत आहे.
रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी माठविक्रीचे व्यवसाय करणारे अनेक विक्रेते दिसून येतात. याबाबत विक्रेत्यांशी चर्चा केली असता यावर्षी माठांची मागणी वाढली असल्याने खप चांगला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होत असल्याने कोणताही खर्च येत नाही. माठाचा आकार व इतर सोयीनुसार माठाचे दर वेगवेगळे आहेत.
''आमच्याकडे फ्रिज आहे. पण, माठातील थंड पाणी पिण्याची मजा काही औरच असते. प्रत्येक उन्हाळ्यात नवीन माठ घेतला जातो. घरातील सर्वजण शक्यतो माठातील थंड पाणीच पितात,'' असे सचिन झांबरे यांनी सांगितले; तर सतत भाड्याच्या खोलीत संसार थाटावा लागत असल्याने जागा व पैशाअभावी फ्रिज विकत घेता येत नाही. पण, उन्हाळा कडक असल्याने गार पाण्यासाठी प्रत्येक वर्षी माठ विकत घेऊन फ्रिजची उणीव भरून काढली जात असल्याचे एका भाडेकरूने नमूद केले.