#WeCareForPune धानोरीतील पीएमपीएल बस थांब्याची दुरावस्था

दिलीप डाळीमकर
Monday, 6 May 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  धानोरी, परांडेनगर येथील मुख्य चौकात असलेल्या बसथांब्यावर गेल्या वर्षभरापासून पत्रे तुटलेले आहेत. या बसथांब्याचा बाजूला धानोरी पोलीस चौकी व मनपा शाळा तसेच मोठा रहिवासी परिसर असल्याने या बसथांब्यावर कायम प्रवाशांची गर्दी असते. बसथांब्यावर पत्रे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात बसची वाट बघणाऱ्या प्रवाशांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.
 
परांडेनगर येथील बस थांब्याची दुरुस्ती संदर्भात धानोरीतील नागरिकांनी मागील वर्षी ५ एप्रिल २०१८ ला पीएमपीएलकडे तक्रार (तक्रार क्र.१८६८५). या तक्रारीवर "याबाबत पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल"असे लेखी उत्तर पीएमपीएल कडून तक्रार दार नागरिकांना देण्यात आले.गेल्यावर्षभरात पीएमपीएल कडून परांडेनगर येथील बस थांब्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही

. पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी पीएमपीएल बस थांब्याची दुरावस्था झालेली असून बस थांब्यावर अश्लील चित्रपटाची पोस्टर व अवैध जाहिराती दिसून येतात. धानोरीतील बस थांब्याची दुरुस्तीसंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल पीएमपीएल व्यवस्थापनाने न घेतल्यास आंदोलनाचा इशारा धानोरीतील नागरिकांनी दिला आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Dalimkar Writes Aboute PMPL bus stop condition in Dhanori