#WeCareForPune प्रवाशाच्या जागरुकतेमुळे अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

#WeCareForPune

पुणे ः महापालिका भवन ते आळंदी बसमधून (क्र. 119) मंगळवारी (ता. 16) अचानक धूर येऊ लागला. बसमधील दिव्यांग प्रवासी सुनील शिंदे यांनी सतर्कता दाखवत चालकाला याची कल्पना दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बस पूर्णतः भरलेली होती. बसमधून अचानक धूर येऊ लागला. शिंदे यांनी याची कल्पना चालकाला दिली. चालकाने तत्काळ बस थांबवली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या सतर्कतेबद्दल शिंदे यांचे चालक व प्रवाशांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to awareness of the passenger