
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
किरकटवाडी : जि.प. प्राथमिक शाळा किरकटवाडी येथे लेक शिकवा अभियानाअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींच्या शिक्षणाच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. इयत्ता सातवीच्या वर्गाने सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर पथनाट्य सादर केले. या प्रभात फेरीत सरपंच गोकूळभाऊ करंजावणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष बांदल, सुवर्णा करंजावणे व शाळा व्यवस्थापन सदस्य आणि सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.