गजानन महाराज मंदिराला अतिक्रमणांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

लक्ष्मीनगर (पर्वती) : येथील गजानन महाराज मंदिराजवळील फुटपाथवर हार-फुले, फळ-भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले, मासे विक्रेते, सिझनल व्यापार करणारे व्यावसायिक यांनी अतिक्रमन केले आहे. त्यामुळे रोज या परिसरात वाहतूक कोंडी  होते. तसेच पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागते. ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात. बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर बिनदिक्कत उभी करतात. 

सध्या तर राखी, गणपती, स्टॉल, रस गुऱ्हाळ  व बस स्थानक यामुळे पूर्ण फूटपाथ व्यापला आहे. येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलिस चौकीला याचे काहीही देणेघेणे नाही. या चौकात वाहतूक पोलिस कधीच नसतात. चौकात रस्तारूंदी करूनही फारसा उपयोग झालेला नाही. मनपा अतिक्रमण विभाग ( सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय) येथे जाणूनबुजून दुर्लक्ष करते. किरकोळ कारवाई करण्याचे नाटक केले जाते. हप्ते गोळा केले जातात. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून लवकरात लवकर कारवाई करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encroachment near temple of Gajanan Maharaj