#WeCareForPune विश्रांतवाडीतील अतिक्रमण, कचऱ्याची समस्या गंभीर 

अश्विन कुमार 
Saturday, 23 February 2019

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : विश्रांतवाडीच्या बीआरटी मुख्य जंक्शनजवळ वाहतूक नियमांविरुद्ध एक मोठा सहाआसनी थांबा तयार केला आहे. अर्ध्या रस्त्यावर बस थांबा असल्यामुळे पुर्ण रस्ता बंद होतो. कितीही वाहतूक कोंडी झाली तरी रस्त्यावरून सहा आसनी रिक्षा हटवणार नाहीत. आरटीओला त्यांना परवानगी दिली आहे का? यावर त्वरित कारवाई केलीच पाहिजे.
 
येथील पदपथसह रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी सगळीकडे अनधिकृत पार्किंग केले जाते. तसेच विक्रेत्यांनी देखील संपूर्ण पदपथावर अतिक्रमण केले आहे. महापालिका याविरुद्ध कारवाई का करीत नाही? दररोज याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. भाजी विक्रेते व्यवसाय करताना दररोज संध्याकाळी प्रचंड कचरा टाकतात. स्वच्छता कर्मचारी दररोज सकाळी मेहनत घेऊन ते स्वच्छ करतात. प्रत्येक भाजी विक्रेत्यावर कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे बंधन असावी. येथे येणारे सर्व खरेदीदार रस्त्यावर अतिशय वाईट मार्गाने वाहन पार्किंग करीत आहेत. रहदारीमध्ये अडथळे निर्माण करतात. स्मार्ट सिटी पुणे मध्ये काय चालले आहे? महापालिका याकडे केव्हा लक्ष देईल .
 
WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment in the respite, garbage problem is serious in vishrantwadi