पुणे शहराची प्रवेशद्वारेच अस्वच्छ

दत्तात्रय जाधव
सोमवार, 21 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : स्वारगेट एसटी स्टँड, शिवाजीनगर एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन तसेच, पुणे रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड ही तिन्ही ठिकाणे पुणे शहराची मुख्य प्रवेश द्वारे आहेत. मात्र या सर्व ठिकाणी वाहतूक शिस्त आणि स्वच्छता नावालाही शिल्लक नाही. त्यातच विशेषतः स्वारगेट आणि पुणे स्टेशन परिसरात निकृष्ठ खाद्य पेयांचे स्टॉल पेयांच्या हातगाड्या पाहिल्यावर मनात प्रश्न येतो की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या महानगरात महापालिका किंवा आरोग्य खाते अस्तित्वात आहे की नाही ? शिक्षण, मॅरेथॉन, सार्वजनिक गणेशोत्सव, फिल्म अॅन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेल्या या शहराला हे भूषणावह निश्चितच नाही. 
पुणे शहराची प्रवेशद्वारच अस्वच्छ

Web Title: the entrance of pune city is unclean