विषमुक्त अन्नासाठी आता उभारायला हवा लढा...

प्राचार्य डाॅ. अर्जुन कुंभार
शुक्रवार, 2 मार्च 2018

आता शेतकऱ्यांनी सुद्धा पिकवताना काळजी घ्यावी लागणार आहे. उत्पादिक होणारे धान्य हे विषमुक्त राहील याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. सेंद्रिय खताचा, कंपोस्ट खताचा वापर शेतीमध्ये करायला हवा.

डाॅ. अब्दुल कलाम म्हणतात की सध्या ज्या प्रमाणात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते आहे. ते असेच वाढत राहीले तर, हे शतक पृथ्वीवरील सजीवांसाठी शेवटचे शतक असणार आहे. यातून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा व त्यानुसार कृतीही करायला हवी. 

वेगाने वाढणारे तपमान, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा विविध कारणांमुळे माणसाचे जीवन कमी होऊ लागले आहे. कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कर्करोग होण्याला तंबाखू हे प्रमूख कारण सांगितले जात असले तरी स्त्रियांमध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. कर्करोग कुणालाही होऊ शकतो. अगदी लहान मुले आणि निर्व्यसनी  माणसाला सुद्धा कर्करोग होऊ शकतो. कारण सध्याची बदललेली जीवनशैली यास कारणीभूत आहे. वाढते प्रदुषण हे यातील मुख्य कारण आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील एका सधन तालुक्यात अनेक व्यक्तींना कर्करोग झाल्याचा अहवाल आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भाजीपाला आणि फळावर फवारली जाणारी रासायनिक किडनाशके. त्याचबरोबर केमिकलमध्ये पिकवली जात असलेली फळे, डासांसाठी घरात वापरली जात असलेली सर्व रसायने, तंबाखू, सिगारेट काॅस्मेटिक आणि अलीकडे चिकन आणि मटनावर सुद्धा होत असलेले रासायनिक द्रवांचे वापर अशी कारण सांगितली जातात. खाद्यपदार्थावर सध्या सुरू असलेले घातक प्रयोगही याचेच कारण आहे. मग खायचे काय हा मोठा प्रश्न आहे.

यासाठी आता शेतकऱ्यांनी सुद्धा पिकवताना काळजी घ्यावी लागणार आहे. उत्पादिक होणारे धान्य हे विषमुक्त राहील याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. सेंद्रिय खताचा, कंपोस्ट खताचा वापर शेतीमध्ये करायला हवा. उत्पादित सेंद्रिय मालाला चांगला दर देण्याचीही हमी आता घेतली जायला हवी. अन्नधान्याचीही अशीच व्यवस्था लागली, तर उत्तमच ! बेकरी, फास्ट फूड, चायनीज पदार्थ टाळावेत.

सर्वांनी सक्तीने मच्छरदानी वापरायला हवी. कारण आपल्या स्वतःच्या  आणि प्रिय कुटुंबीयांच्या आरोग्य आणि  जीवनापेक्षा इतर काहीही महत्त्वाचे नाही. यासाठी आता विषमुक्त अन्नासाठी लढा उभारणे ही काळाची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Esakal Citizen Journalism Dr Arjun Kumbhar article