#WeCareForPune : सत्ताधाऱ्यांचा फलक ठरतोय पादचाऱ्यांसाठी धोकादायक 

संजय मेमाणे 
Saturday, 22 June 2019

 पुणे : टिळक चौक येथील संभाजी पोलिस चौकीचे नुतनीकरण पूर्ण झाले असून ते काम सत्ताधारी पक्ष यांनी केले आहे. हे दर्शविण्यासाठी येथे फलक लावण्यात आला आहे. पण हा फलक तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो.

 पुणे : टिळक चौक येथील संभाजी पोलिस चौकीचे नुतनीकरण पूर्ण झाले असून ते काम सत्ताधारी पक्ष यांनी केले आहे. हे दर्शविण्यासाठी येथे फलक लावण्यात आला आहे. पण हा फलक तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो.

फलका मागे पाण्याच्या टाक्या आहेत व फलक पण कमी उंचीवर लावलेला आहे. त्यामुळे लोकांना तो लागू शकतो व डोक्याला, डोळ्याला इजा होऊ शकते. शेवटी हा फलक सत्ताधारी यांनी लावलेला असल्यामुळे आकाश चिन्ह विभाग यांची परवानगी घेण्याची गरज नाही. तरी हा फलक नवीन पोलिस चौकीच्यावर लावावा म्हणजे तो सर्वांना दिसेल. असे फलक लावताना पादचारी लोकांची सुरक्षा बघून लावावेत व पुढील संभाव्य दुर्घटना टाळाव्यात.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flex is dangerous for pedestrians at Tilak chowk in pune