महावितरणच्या डीपीमुळे फुटपाथ बंद

शिवाजी पठारे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरुड : मयूर कॉलनीतील सोलॅरिस क्लबचे फुटपाथवर महावितरण कंपनीने एक नवीन डी.पी.बसविला आहे. ज्यामुळे संपूर्ण फूटपाथ बंद झाला आहे. या रस्त्यावर एकाच बाजूस फुटपाथ आहे. त्यामुळे येणारे जाणारे पादचारी याच फुटपाथवरून चालतात. यामुळे रस्त्यावर उतरून चालावे लागते. महावितरणने डी.पी.कसे बसवावेत याचे काही नियम नाहीत काय? महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिका आणि महावितरणला विनंती आहे. सदर डी.पी.त्वरीत हलवून पदपथ रिकामा करावा व संबंधितांवर कारवाई करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Footpath closed Due to the DP of MSED