#WECareForPune विश्रांतवाडी ते धानोरी लोहगाव रस्त्यावर कचरा समस्या गंभीर

सुनिल शिंदे
Tuesday, 26 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

विश्रांतवाडी : विश्रांतवाडी ते धानोरी लोहगाव मुख्य रस्त्यावर कचरा टाकला जातो. त्या ठीकाणी पीएमटीचा बस थांबा आहे. शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक अंध-अपंग त्याठिकाणी उभे राहतात. येथे उभे राहायला देखील जागा नाही. अशा ठिकाणी कचरा टाकला जातो आणि तो कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे दुर्गंधी पसरुन घाण वास येतो आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत आहे.

आजुबाजुला सोसायटी आहे. त्याठिकाणी ती सोसायटीचे लोक कचरा रस्त्यावर टाकतात. जे लोक कचरा रस्त्यावर टाकतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आधीच त्या ठिकाणी रस्ता अरुंद असून तिथे अपघात होऊ शकतो. प्रशासनाने त्यांच्या वरती दंडात्मक कारवाई करावी. भविष्यात त्या ठिकाणी काही झाले तर जबाबदार प्रशासन असेल. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage on Vishrantwadi to Dhanori Lohaga road