आरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त 

अनिल अगावणे 
Thursday, 15 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना हॉस्पिटलसमोर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला असतो. या कचऱ्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्ण, स्थानिक रहिवाशी तसेच दिवसभर येणारे-जाणारे वाहनचालक, पादचारी यांना नाकाला रुमाल धरूनच जावे लागते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी मस्त, आणि नागरिक त्रस्त असा प्रकार वाढला आहे. या दुर्गंधीमुळे रुग्ण व्यवस्थित बरा होईल का? की रुग्ण नसलेला सर्वसामान्य व्यक्ती ही आजारी पडेल! याचा विचार महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने ताबडतोब कचऱ्याचे कंटेनर ठेवून दररोज स्वच्छता केली जाते की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health employees are cool, civilians suffer