अवजड वाहतूक बंदी कागदावरच 

अॅड. गिरिष भोसाळ
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे कामासाठी येथे खोल खड्डे केले आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि प्रशासनाचा आदेश झुगारून येथे मोठे वाहनचालक आणि स्कूलबस चालक या मार्गाचा वापर करत आहे. नुकतीच उड्डाणपुलाचे कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भविष्यात येथे जीवितहानी टाळण्यासाठी अवजड वाहने व स्कूलबस यांना या मार्गावर प्रतिबंध करण्यात यावा. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy traffic restriction apply only on paper