पुणे : खडवासला येथे राहणाऱ्य़ा राज सपकाळ या तरूणाचे वडील कै.बाळासाहेब सपकाळ यांचे दोन वर्षांपूर्वी अकाली निधन झाले होते. 3 मार्चला त्यांचे वर्षश्राद्ध होते. वडीलांच्या वर्षश्राद्धानिमित्त पारंपारिक विधी न करता काहीतरी सामाजिक कार्य करायचे असे राजने ठरवले.

राजने वर्षश्राद्धासाठी येणारा खर्च टाळून त्यापैशाचा किराणा माल, फळे व इतर खाद्यपदार्थ वृद्धाश्रमात देण्याचे ठरवले. त्यासाठी सामाजिक कार्य करणारे शिक्षक लक्ष्मण माताळे सर व शास्त्री मॅडम यांच्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील ओलावा या वृद्धाश्रमात संपर्क करण्यात आला. त्यांनी सहमती दिल्यानंतर हे सर्व साहित्य त्यांना देण्यात आले. वडीलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज सपकाळ या तरूणाने हा मार्ग निवडला अन् समाजोपयोगी वेगळा आदर्श निर्माण केला. म्हणून गावातील सरपंच सौरभ मते पाटील व इतर सुजाण नागरिकांनी कौतुक केले.
विविध प्रथा परंपरांना आळा घालून अशी समाजोपयोगी कार्य करणे व गरजूंना मदत करणे हा विचार सर्वांनी अंगीकारण्यासारखा आहे. असा वेगळा विचार मांडणाऱ्याला तरूणाईला समाजानेही पाठबळ देणे गरजेचे आहे.