"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या उद्यानाच्या आत महाद्वाराजवळच "पुणे हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा फलक आहे. महापालिका इमारत या पहिल्या बिंदूपासून सुरू होऊन ते विश्रामबागवाडा शेवट अशी 18 ठिकाणं यात दाखवली आहेत. मात्र, फलकावरील दूरध्वनींवर संपर्क होऊ शकला नाही. तसेच ई-मेलवर संपर्क करूनही काही उत्तर मिळाले नाही. महापालिकेतील "हेरिटेज सेल'शी संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. 

या उपक्रमास 2012 मध्ये पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे महापालिकेच्या संकेतस्थळावर नमूद केलं आहे. हा उपक्रम बंद झाला असेल तर उद्यानातील फलक हटवावा. महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वयंसेवकांसाठी आवाहन केलेले आहे. संकेतस्थळावरच पर्यटकांची नोंदणीची व्यवस्था केल्यास सर्वांच्या दृष्टीने ते सोयीचे होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The "Heritage Walk" is on or off