मी पुणेकर...का? आम्ही पुणेकर...

स्वप्नील मस्के
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुण्यात नुकतीच घडलेली होल्डिंगची घटना.... खरचं मनाला हेलावून टाकणारी आहे. ह्या घटनेनंतर पुण्यात फिरावं कि नको हि भीती काही लोकांनी बोलून दाखवली. साहजिक आहे अशा घटना काही रोज घडणार नाहीत. पण विचार केला तर, वाटत कुठं वाटचाल करत आहोत आपण स्वतः ? आनंदी जीवन जगण्यासाठी हजारो लोक आज शहरात पाऊल टाकत आहोत. याच शहरांमध्ये आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधत आहोत आणि काहीतरी मोठं करून दाखवण्याची संधी शोधत आहोत. या सगळ्यात आपण राहू ना.....कि आपलंही............

मग वाटत जावं आणि एका दिवसात सगळी व्यवस्था बदलावी पण हे शक्य नाही हे माहिती आहे. पण किड्या मुंग्यांसारखा लोकांचा जीव जातो आहे. यासाठी काहीच करता येणार नाही का ? आता तर असं वाटायला लागले आहे की,.....आपल्या लोकांना मारण्यासाठी या दहशदवादयाची गरज काय? रस्ते अपघात, रेल्वे अपघात, चेंगराचेंगरी, त्सुनामि, अतिवृष्टी, दुष्काळ एक नाही तर जीवावर घाला घालणारी अशी हजारो कारणे देता येतील. या सगळ्यात देशात 50 ऐक लोक तर दररोज आपला जीव गमवत आहेत. त्यासाठी सगळ्यांनी स्वतः नियम पाळायला हवे. कारण आम्ही पुणेकर असं म्हणायचं का मी पुणेकर असं म्हणायचं .....हे आता पुणेकरांनीच ठरवावं. 

 

#makepunsafe पुणेकर म्हणुन आपल्याला काय वाटते? सोशल मिडीयातून अथवा webeditor@esakal.com या ईमेलद्वारे आम्हाला कळवा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am Punekar... or We Punekar...