कात्रज कोंढवा रस्त्यावर अवैध पार्किंग 

मिलिंद 
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : गोकुळनगर, कात्रज, कोंढवा रस्ता येथे स्टेट बॅंकेच्यासमोर दररोज अनेक अवजड वाहने, वाळुचे ट्रक व प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ट्रस्ट टॅक्सी, टेंपो अवैधरीत्या उभी करण्यात येतात. सदर वाहनांच्या आडोशाला रात्रीच्या वेळी अंधारात मद्यपी व टवाळखोरांचा वावर असतो.

या ठिकाणी बस थांबा असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना व आजुबाजुच्या रहिवाशांना त्रास होतो. कोंढवा भागात कार पार्किंगच्या भांडणाची शक्यत नाकारता येत नाही. तरी याबाबत संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal parking on Katraj's Kondhwa road