कात्रज बोगद्यातील प्रवास धोकादायक 

खेड शिवापूर
Tuesday, 2 July 2019

निसरडा रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव 

कात्रज नवीन बोगद्याबाहेरच्या धोकादायक झालेल्या दरडी, बोगद्यात वाहणाऱ्या 
पावसाच्या पाण्याने निसरडा झालेला रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव आदी कारणांमुळे कात्रजच्या नवीन बोगद्यातील प्रवास धोकादायक बनला आहे. 

पुणे : कात्रज नवीन बोगद्याबारडा रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव हेरच्या धोकादायक झालेल्या दरडी, बोगद्यात वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याने निसरडा झालेला रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव आदी कारणांमुळे  कात्रजच्या नवीन बोगद्यातील प्रवास धोकादायक बनला आहे. 

सध्या पावसात बोगद्याच्या झालेल्या या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. दर वर्षी पावसाळ्यात होणाऱ्या या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कात्रज घाट परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.

पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने जाताना कात्रज नवीन बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूच्या दरडी धोकादायक झाल्या आहेत. गेल्या वर्षी येथील दरडीचा काही भाग कोसळला होता. तर, चार दिवसांपूर्वीही येथील दरडीचा काही भाग कोसळला आहे. या दरडींवर लावण्यात आलेला सिमेंटचा थर (शॉर्ट क्रिटिंग) कमकुवत झाले आहे. त्यामुळे पावसात हा थर निघून दरडीचा काही भाग कोसळत आहे. तर, नवीन बोगद्यात पुणे-सातारा लेनमध्ये पावसाचे पाणी साचून रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहने घसरण्याचे प्रकार होत आहेत. दर वर्षी पावसाळ्यात बोगद्यात पावसाचे पाणी झिरपून वाहते. त्यातच बोगद्यातील अनेक ठिकाणी विजेचे दिवे बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण बोगद्यात अंधूक प्रकाश आहे.

तसेच दोन्ही बाजूच्या बोगद्यात रिफ्लेक्‍टर नसल्याने वाहनचालकांचा वाहन चालविताना गोंधळ होतो. अशा या धोकादायक आणि अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा दुर्लक्ष करीत आहे. धोकादायक झालेल्या दरडीखाली रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात येतील. तर, बोगद्यात येणाऱ्या पावसाच्या पाण्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katraj tunnel become a dangerous for travel