खडकवासला रस्त्यावर खड्डेच खड्डे 

बाबासाहेब चव्हाण 
गुरुवार, 19 जुलै 2018

खडकवासला : खडकवासला ते कोल्हेवाडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पाणी साठल्याने तेथून ये-जा करणे अशक्‍य झाले आहे. वाहनचालकांनाही रस्ता व त्यावर असलेल्या खड्ड्यांचा पाण्यामुळे अंदाज येत नाही. मंगळवारी संध्याकाळी या रस्त्यावर चारचाकी खड्ड्यात अडकली होती. तिच्यामध्ये लहान मुले आणि महिला होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तेथील स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे ती गाडी बाहेर निघाली.

दर वर्षीच पावसाळ्यात पुण्यातील रस्त्यांची हीच अवस्था होते. अशा धोकादायक रस्त्यांमुळे कित्येक अपघात होतात. पावसाळ्यापूर्वीच जर रस्ते दुरुस्ती केली, तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. 

नऱ्हे-धायरी रस्त्यावर खड्डे आणि चिखल 

धोकादायक खड्डा 

Web Title: khadkwasla road potholes