चारचाकी, जड वाहनांवर मोबाईल नंबर सक्तीचा करावा

अनिल  अगावणे
गुरुवार, 26 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : दिवसेंदिवस चारचाकी वाहने घेण्याचे फॅड वाढतच आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न जटिल बनला आहे. वाहने रस्त्यांवर पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनचालक जिथे जागा दिसेल तिथे वाहन पार्किंग करून खुशाल निघून जातात. त्यामुळे इतरांची मात्र पंचाईत होते. वाहतूक कोंडीने रस्ते बंद होतात. काही वेळेला तर दुचाकी वाहनांच्या पार्किंग जागीच चारचाकी, अवजड वाहने पार्क करतात.
 
शासनाकडे ही वाहने उचलून किंवा जॅमर लावण्यासाठी अजिबात मनुष्यबळ नसल्याने हे वाहनचालक सोकावले आहेत. शिवाय भांडण्यासाठी ही मंडळी कायम तयार व तरबेज असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या भानगडीत पण पडत नाही. पण प्रशासनाने अशा वाहनचालकांवर कारवाई ताबडतोब केली पाहिजे. यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा केली पाहिजे. तसेच प्रत्येक चारचाकी वाहनांवर वाहन चालकाचा मोबाईल नंबर दिसेल अशा मोठ्या अक्षरात प्रथम दर्शनी असलाच पाहिजे. हाच तोडगा त्या वाहन चालकाला ताबडतोब गाडी काढण्यास भाग पाडेल यासाठी प्रशासनाने या नियमाची सक्ती केलीच पाहिजे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile number must be compulsory for four-wheelers, heavy vehicles