नवचैतन्य हास्ययोगचा वर्धापन दिन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 April 2019

पुणे : नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे 22 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे, असे प्रतिपादन लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी केले. 

सहकारनगर बागूल उद्यान शाखेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी या पुनरुज्जीवित शाखेचे कौतुक करत शाखाप्रमुख किरण गुळुंबे यांचे कौतुक केले.

डॉ. संजीव डोळे यांनी डॉक्‍टर व रुग्णाचे वेदना विसरायला लावणारे हास्य यांची सांगड घालण्यासाठी असे उपक्रम आवश्‍यक असल्याचे सांगितले. डॉ. दत्ता कोहिनकर यांचे "मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती' या विषयवार व्याख्यान झाले. महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, वंदना भिमाले यांनी या वेळी भेट दिली. उपाध्यक्ष विजय भोसले, सुमन काटे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात सुनंदा गुळुंबे, सुजाता सरडे व शैलजा महामुनी यांच्या स्वागतगीताने झाली. किरण गुळुंबे यांनी प्रास्ताविक केले. सुनंदा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. उपप्रमुख सुनील शहा यांनी आभार मानले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navchaitanya laughter club celebrates seventh anniversary