नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायदा हवा

दत्तात्रय जाधव
सोमवार, 11 जून 2018

पुणे : आपल्या देशात नद्यांना धार्मिक बाबतीत अन्यन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आपण नदीनाल्यांना पवित्र भावनेने गंगा संबोधतात. मात्र गेल्या काही वर्षात धार्मिक विधी करताना आपल्या पवित्र धार्मिक संकल्पना विसरून नद्यामध्ये मृत जनावरे देवदेविकांचे खराब झालेले फोटो, मुर्ती, निर्माल्य, मृतांची राख, शिळे-कुजलेले अन्न, बिनदिक्कत नदीनाल्यामध्ये टाकताना थोडा सुध्दा विचार करत नाही. परिणामी नद्यांचे गटारात रूपांतर झाले आहे. काही ठिकाणी तर नद्या अक्षरशः मृत झालेल्या आहेत. ही नदी नाल्यांची अशीच हेळसांड होत राहिली तर पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट होऊन हाहाकार माजेल. म्हणून जनता आणि सरकारने कायदे लोकशिक्षणातून जनजागृती करून नद्यांना जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need to create law to prevent pollution of rivers

टॅग्स