वडाच्या मुळांना वाढण्यासाठी अडथळा 

जयराम कुलकर्णी 
रविवार, 22 जुलै 2018

औंध : पुणे विद्यापीठ आणि औंध परिसरात स्मार्ट सिटीचे कामे सुरू आहेत. परंतु कामे करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता केवळ दिसेल तिथे सिमेंट ओतले जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा सर्विस डक्ट म्हणून मोठे प्लास्टिक पाईप सोडून त्यावर पुन्हा सिमेंट ओतले आहे.

या रस्त्यावर खुप जुनी मोठी मोठी वडाची झाडे आहेत. त्या वडाच्या झाडांच्या पारंब्यांच्या खाली पूर्ण सिमेंट फ़ुटपाथ तयार केला आहे. त्यामुळे वडाच्या मुळांना जमिनीवर तग धरण्यासाठी जागा उरलेली नाही, आता त्या मुळांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. औंध भागात रस्ता लहान आणि फूट पाथ मोठा झाला आहे. सिमेंट रस्त्यावर साचलेले पाणी जाणार कुठे? भविष्यात स्मार्ट सिटीच्या नियोजनात या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstacles to grow root of tree