एसटी स्मार्ट कार्डसाठी जेष्ठाना नाहक त्रास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : एसटी महामंडळा ने 65 वर्षा वरील जेष्ठ नागरीकांना प्रवासात हाफ तिकीट सवलती साठी 50 रुपये भरुन नव्याने स्मार्ट कार्ड काढण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरीक एसटी स्थानकाच्या आवारात विनाकारण ताटकळत बसत आहेत.

या स्मार्ट कार्डसाठी आधार कार्डची झेराॅक्स आणि मोबाईल याची गरज पडते. स्मार्ट कार्डची, मोबाइलची सक्ती केली जाउ नये. तसेच आसपासच्या गावातुन लोक स्मार्ट कार्डसाठी अक्षरश: सोबत जेवणाचे डबे घेऊन येत असुन दिवसभर त्यांना थांबल्यावरच कार्डची नोंद होते.

तसेच एका मोबाईलवर एकाच व्यक्तीचे कार्ड मिळते. पती पत्नींना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाची महामंडळाने सक्ती केली आहे. दुसर्या कार्ड साठी नवीन क्रमांकाचे सीम आणि हँडसेट घेण्याचा विनाकारण भुर्दंड पडत आहे. ही बाब फार अडचणीची असल्याने एसटीने ही कार्ड पद्धती त्वरीत बंद करावी.

तरी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड सक्ती रद्द करून तसे त्वरीत जाहीर करावे अशी जेष्ठ नागरीकांची मागणी आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old people ubdergo trouble due to smart card