#WeCareForPune 'सकाळ' व वारजे गावाचे जुने ऋणानुबंध 

अॅड. राहुल म्हाळसाकांत पाटील 
शनिवार, 30 मार्च 2019

पुणे : 1 जानेवारी 1932 मध्ये पहिला अंक प्रकाशित झालेल्या 'सकाळ'चे व वारजे गावचे तसे खूप जुने व आपुलकीचे नाते आहे. सध्याची वारजे स्मशानभूमी ते हायवे चौक या रस्त्यावर पूर्वी पूर्णपणे शेती होती. सदर शेतजमीन वारजे गावचे पहिले सरपंच कै. हभप बाबासाहेब नामदेवराव बराटे यांच्या मालकीची होती. ती कालांतराने त्यांच्याच भावकीत कै. सुदाम बराटे यांचे वाट्याला गेली

पुणे : 1 जानेवारी 1932 मध्ये पहिला अंक प्रकाशित झालेल्या 'सकाळ'चे व वारजे गावचे तसे खूप जुने व आपुलकीचे नाते आहे. सध्याची वारजे स्मशानभूमी ते हायवे चौक या रस्त्यावर पूर्वी पूर्णपणे शेती होती. सदर शेतजमीन वारजे गावचे पहिले सरपंच कै. हभप बाबासाहेब नामदेवराव बराटे यांच्या मालकीची होती. ती कालांतराने त्यांच्याच भावकीत कै. सुदाम बराटे यांचे वाट्याला गेली. 

कालांतराने सदर शेती 'सकाळ'चे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी विकत घेतली व माझ्या आजोबांसहित अनेक ग्रामस्थांना रोजगार निर्माण झाला. त्या वेळी 50 पैसे (आठ आणे) इतका रोज कष्टकऱ्यांना मिळत असे व तो खूप व्हायचा. 

बराटे कुटुंबाची सदर शेतात एक विहीर होती. स्वाभाविकच ही विहीर डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या मालकीची झाली. सध्याच्या ओढ्याखालील एक डोह व विहीर, हे दोनच पर्याय पिण्याच्या पाण्यासाठी तेव्हा उपलब्ध होते. त्यामुळे तत्कालीन बराटे कुटुंबानी व नानासाहेबांनी पिण्याच्या पाण्याचा कुठलाही मोबदला घेतला नाही. 'धरण उशाला व कोरड घशाला' ही परिस्थिती त्या काळी निर्माण झाली नाही. 'सकाळवाल्यांची विहीर' हा शब्दप्रयोग आजही वापरला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old Relationship to Sakal and Warje Village