#WeCareForPune ओव्हर स्मार्ट बस थांबा 

सदानंद धायगुडे 
शुक्रवार, 22 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

कोथरूड : गणंजय सोसायटी येथील प्लॉट क्रमांक 33, आनंदघन या बंगल्यासमोर नवीन बस स्टॉप बसविला आहे. पुणे महापालिकेच्या स्मार्ट बस स्टॉप योजनेनुसार बसविला असावा. पण त्या बसस्टॉपचे स्वरूप पाहता कोणत्याच दृष्टीने तो स्मार्ट आहे असे दिसत नाही.

जुन्या बस स्टॉपवरील बाके या नवीन पेक्षा चांगली होती. तसेच वर छतदेखील मोठे व दणकट होते. ज्यामुळे ऐन पावसापासून थोडा बचाव व्हायचा. आताच्या बसस्टॉपमध्ये, पुढे कठडा नाही. बसायच्या बाकामागे पातळ पत्र्याच्या बदामाच्या आकाराचे तीन शीट लावले आहेत. ते मुलांच्या हाताला लागून जखमा होतील, असे आहेत. खाली कडप्पा दगड टाकल्यामुळे त्यावर खूप धूळ साचते आणि पावसाळ्यात पाय घसरतात. पुढे आडोसा नसल्याने पावसाचे पाणी बसणाऱ्यांच्या अंगावर उडते.

तरी या सर्व बाबींचा विचार करून खऱ्या अर्थाने स्मार्ट नसणाऱ्या बसस्टॉपमध्ये सुधारणा करावी. "स्मार्ट'च्या नावाखाली उधळपट्टी थांबवावी. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. 
-

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Over the Smart Bus Stop