लोका सांगे ब्रम्हज्ञान 

अनिल अगावणे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे : देशभर स्वच्छता मोहिमेचा प्रचार व प्रसार सुरू आहे. त्यात स्थानिक स्वराज संस्था मागे कशी पडणार. पण, आम्ही लोकांना सांगतो कचरा रस्त्यावर टाकू नका. पावसाळ्यात कचरा साचू देऊ नका. त्यामुळे डास, दुर्गंधी याचा त्रास तुम्हाला होईल. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे पुणे महानगरपालिकेचा कारभार चालू आहे.

डॉ. कोटणीस दवाखाना (गाडीखाना) या ठिकाणी कचरा व भंगार वस्तूचा ढीग पडलेला आहे. दवाखाण्यासारख्या ठिकाणी कचरा व भंगार साठविल्यामुळे औषधोपचारासाठी आलेल्या रुग्णांना अशी आरोग्यासेवा देणार काय? खरेतर स्वच्छतेची सुरुवात प्रथम आपल्यापासून केली पाहिजे. तेव्हाच इतरांना उपदेश केल्याचा फायदा होईल. महानगरपालिकेच्या दवाखाण्यात अशा प्रकारे कचरा व भंगार अनेक ठिकाणी पडलेले आहे याची दखल महानगरपालिका घेणार आहेत की नाही? कि रुग्णांच्या आरोग्याशी अशाच प्रकारे लपंडाव खेळणार?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc should follow their campaign