पीएमपी ओळखपत्राबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा 

पंजाबराव देशमुख 
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

पुणे : मी 2009 मध्ये रोजच्या प्रवासासाठी पीएमपीचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काढले होते; मात्र त्यावर कोणतीही मुदतीची तारीख दिली नव्हती. आता मात्र या ओळखपत्रासाठी 155 रुपये आकारण्यात येतात. 2015 मध्ये माझे नवीन ओळखपत्र काढले तेव्हा 15 रुपये आकारून 31 मार्च 2018 पर्यंत मुदत दिली होती. आता पुन्हा नवीन ओळखपत्र काढण्यास गेलो असता 2009 चे ओळखपत्र चालेल असे मला सांगण्यात आले; परंतु एका वाहकाला विचारले असता तुमच्या ओळखपत्राला 10 वर्ष झाली, आता नवीन ओळखपत्र काढा, असे सांगितले. पीएमपी प्रशासनास विनंती आहे की विनामुदतीचे ओळखपत्र चालू शकेल का? याचा खुलासा करावा. नवीन ओळखपत्र काढणे आवश्‍यक असल्यास 2015 प्रमाणे मोफत देण्याच्या सूचना पास केंद्रास द्याव्यात. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदीतून हा ओळखपत्राचा खर्च करणे शक्‍य आहे. त्वरित निर्णय घ्यावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP administration should decide on credentials